LIVE UPDATES

राज्यातील नगरपरिषदांवर सावंतवाडी पडली भारी

अंतिम सामन्यात पटकावल जेतेपद
Edited by: विनायक गांवस
Published on: February 13, 2023 13:25 PM
views 267  viewes

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदांच्या महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मार्फत क्रिकेट व कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. सावंतवाडी नगर परिषदेने महाबळेश्वर येथे क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. एकूण 58 नगरपरिषद व नगरपालिका यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. सावंतवाडी नगरपरिषदेने अंतिम सामन्यात मोहोळ नगरपरिषदेत मात देऊन अंतिम सामन्यात विजय संपादन केला असून विजेतेपद पटकावल आहे. याबाबत राज्यातील सर्व नगरपरिषेकडून सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येते आहे. यावेळी माजी सभापती बाबु कुडतरकर, नगरपरिषदेचे भाऊ भिसे, पांडुरंग नाटेकर, देवीदास आडारकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.