LIVE UPDATES

नगरसेवक रोहन रावराणे यांची राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’साठी निवड

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 25, 2026 19:59 PM
views 37  views

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रोहन जयेंद्र रावराणे यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ), कोल्हापूर यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..या पुरस्काराचे वितरण रविवार, २८ जून २०२६ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होणार आहे.

  रोहन रावराणे हे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक असून त्यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून नागरिकांचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्यांनी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आविष्कार फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत रोहन रावराणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे

श्री रावराणे यांनी नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या विकासासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.