
वैभववाडी : लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे. संविधानातील विचार आणि तत्त्वे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले.
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ, माता रमाई महिला मंडळ आणि अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवनात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बौद्ध सेवा संघाचे उपाध्यक्ष संतोष कदम यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यामध्ये विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संविधानातील मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत त्यानुसार जीवन जगण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला तालुका बौद्ध सेवा संघाचे भास्कर जाधव, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रवींद्र पवार, शरद कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम, शारदा कांबळे, शरद नारकर, बाबुराव रावराणे, भास्कर नादकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणारे जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मृत नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








