
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी वितरणात व खर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम स्थानी आला त्याबद्दल सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले व सर्व कार्यालयाने टीमचे अभिनंदन केले.
जिल्ह्याला उपलब्ध झालेला जिल्हा वार्षिक योजनेतील 282 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात व तो सर्वच्या सर्व खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सर्वप्रथम आला. सर्व जिल्ह्यांच्या रँकिंगमध्ये हा जिल्हा प्रथम स्थानी आला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी सर्व विभागांशी समन्वय ठेवून केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला. जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले व त्यांच्या कार्यालयाने घेतलेली मेहनत यामुळे या जिल्ह्याला हे यश मिळाले. याबद्दल स्वतः जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शनिवारी खास अभिनंदन केले.












