LIVE UPDATES

Sonurli Vetye road side strip work : जत्रोत्सवापूर्वी सोनुर्ली-वेत्ये रस्त्याच्या साईटपट्टीचे काम पुर्ण करा

अन्यथा आंदोलन : उपसरपंच भरत गावकर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 13, 2026 06:05 PM
views 63  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी झालेल्या सोनुर्ली ते वेत्ये या रस्त्याच्या साईट पट्टीच्या कामाकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे परिणामी अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या सोनुर्ली जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अन्यथा ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे.

सोनुर्ली गावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे वेत्ये ते सोनुर्ली या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आले संबंधित रस्त्याच्या डागडुजीची पूर्णता जबाबदारी पाच वर्ष संबंधित ठेकेदाराची असताना रस्त्याच्या डागडुजीचे  सोडाच परंतु साईट पट्टी चे काम दोन वर्षे उलटूनही अद्याप सुद्धा पूर्णत्वास आलेले नाही वारंवार यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही केवळ आश्वासनापलीकडे त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

संबंधित रस्त्याचे काम करताना ठेकेदाराकडून जुन्या संरक्षण भिंतीचे टाकाऊ मटेरियल गटारातच ठेवले आहे त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी पाणी वाहून जाताना मोठा अडथळा निर्माण झाला, या परिस्थितीकडे सुद्धा ठेकेदाराचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले परंतु ठेकेदाराची मनमानी कारभार अद्यापही सुरू असून अधिकारी वर्गही त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप उपसरपंच श्री. गावकर यांनी केला.

दुसरीकडे एका वस्तीच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर मोरे टाकण्याचे कामही अद्याप संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आलेले नाही काम सुरू करताना संपूर्ण गावाने सहकार्य करून सुद्धा संबंधित ठेकेदार रस्त्याचे काम पूर्णत्वास आणण्यास तसेच साईट पट्टीचे काम पूर्णत्वास घेण्यास दुर्लक्ष करत आहे तरी सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव येत्या 25 नोव्हेंबर रोजी होत आहे त्यापूर्वी या साईट पट्टीचे काम पूर्णत्वास न लावल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच श्री. गावकर यांनी दिला आहे.