गावखडीत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम

मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्सचा पुढाकार
Edited by: मनोज पवार
Published on: October 02, 2024 10:52 AM
views 117  views

रत्नागिरी : गावखडी ग्रामपंचायत आणि शिवार आंबेरे महाविद्यालयाच्या वतीने गावखडी समुद्रकिना-यासाठी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनने गावखडी समुद्रकिनारी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.


गावखडी ग्रामपंचायत, रत्नागिरी यांच्या आवाहनानुसार सरस्वती विद्यामंदिर गावखडी, शिवार आंबेरे महाविद्यालयातील विद्यार्थी, अंगणवाडी शिक्षक, जि.प. शाळा शिक्षक, आशा वर्कर्स, बचत गट महिला, पंचायत सदस्य, मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स कंपनीच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.


अशा कार्यक्रमांमध्ये लोकांच्या सहभागाचा उद्देश, त्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संवेदनशील बनवणे आणि समुद्रकिनारे स्वच्छ राखण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे हा कंपनीचा उद्देश आहे. या वेळी समुद्रकिनारी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. ग्रामपंचायतीने प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करण्यासाठी चॅनेलाइजेशन करण्याचे नियोजन केले आहे. फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनने सहभागींना अल्पोपहार देऊन या मोहिमेला पाठिंबा दिला. ग्रामपंचायत सदस्य आणि शाळांनी हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी फिनोलेक्स आणि एमएमएफने घेतलेल्या सततच्या प्रयत्नांचे कौतुक केले.