
सावंतवाडी : सावंतवाडीचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेत मैत्री जपली. नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा थोडक्याचं मताने पराभव झाला. यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री. साळगावकर यांच्या गुरुकुलमध्ये भेट घेऊन पराभवाने खचून जाऊ नका तर याही पुढे अधिक जोमाने सामाजिक कार्यामध्ये सक्रिय व्हा तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची या शहराला खूप गरज आहे असे उद्गार काढले. याप्रसंगी नगरपरिषद कर्मचारी दीपक म्हापसेकर व बंड्या तोरस्कर उपस्थित होते.











