काजू बागायतीला आग

दोडामार्ग न.पं.चा अग्निशमन बंब तातडीने पोहोचला ; पुढील अनर्थ टळला
Edited by: लवू परब
Published on: February 13, 2026 20:25 PM
views 47  views

दोडामार्ग :  झरेबांबर काजुळवाडी येथे शुक्रवारी दुपारी काजू बागायतीला आग लागून २०० हुन अधिक काजू कलमे जळून खाक झाली. पिकुळे शेळपीवाडी येथील प्रदीप नाईक असं त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना कसई दोडामार्ग नगरपंचायतला समजताच अग्निशमन बंमने सदरील आग आटोक्यात आणली.

याबाबत आधी घटना अशी की, शुक्रवारी दुपारी झरेबांबर काजूळवाडी येथे एका काजूच्या बागेतून आगीचे धूर येत असल्याचे काही लगतच्या ग्रामस्थांना निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अन्य सहकाऱ्यांना या आगीची कल्पना दिली. लागलीच कसई दोडामार्ग नगरपंचायतीचा अग्निशमन बंब पाचारण करून येथील आग आटोक्यात आणली.

यावेळीच ही आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी विद्यामन जिप सदस्य दीपक गवस, आनंद तळनकर, पिकी कवठणकर, नयन भणगे, पेडणेकर, तसेच नगरपंचायतचे कर्मचारी सावंत, ताटे, पप्पू, सचिन, यांनी मदत कार्य केले.