LIVE UPDATES

झाड कोसळून कारचे मोठे नुकसान

सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 18:54 PM
views 37  views

सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा तहसीलदार निवासस्थानाजवळ झाड कोसळले. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून यात कारचे नुकसान झाले आहे. आज सायंकाळी पावसानं जोर धरला होता. यावेळी तहसीलदार निवासस्थानाजवळी हे झाड कोसळले. सुदैवाने यात कोणाला हानी झाली नसली तरी येथे पार्क केलेली क्रेटा कार व पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच हे झाड हटविण्यासाठी कर्मचारी दाखल झाले.