
कणकवली : कलमठ - बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील मिळून जवळपास २ लाखांहून अधिक मुद्देमाल चोरल्याप्रकरणी अटक व पोलीस कोठडीत रवानगी झालेला चोरटा लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने उर्फ (२८, रा. पंढरपूर - सोलापूर) याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली. ही घरफोडी २ जूनच्या पहाटे घडली होती. तर कणकवली पोलीस व एलसीबीच्या पोलिसांनी एकत्रितपणे शोधमोहिम राबवत चोरटा लखन कुलकर्णी उर्फ सचिन माने याला शनिवारी गोकर्ण कर्नाटक येथे अटक केली होती.