LIVE UPDATES

मोदी सरकार संकल्प सिद्धी ; देवगड मंडलात विविध उपक्रम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 18, 2025 21:57 PM
views 175  views

देवगड : मोदी सरकार ११ वर्षे संकल्प सिद्धी कार्यक्रम अंतर्गत देवगड येथिल मंडलात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार संपूर्ण महिनाभरात या अभियानातील कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी ऍड अजित गोगटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची ११ वर्षे संकल्प ते सिद्धी कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ३० मे रोजी २०२५ रोजी ११ वर्षे पूर्ण होत आहे .या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष जे .पी नड्डा यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात मोदी सरकारचे ११ वर्ष संकल्प ते सिद्धी अंतर्गत जिल्हा मंडल शक्ती केंद्र आणि बुथ पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती माजी आमदार ऍड अजित गोगटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

या कार्यक्रमांतर्गत जिल्हा समिती मंडळ समिती संयोजक मंडळ अध्यक्ष सदस्य पदाधिकारी नियुक्त करण्यात आले असून या अंतर्गत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोदी सरकारची अकरा वर्ष संकल्प ते सिद्धी कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देत असताना विविध व्यावसायिकांचे संमेलन नुकतेच संपन्न कणकवली येथे संपन्न झाल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यानंतर मंडळ स्तरावर कार्यक्रमांतर्गत विकसित भारताचा संकल्प करून शहरी भागात चौकसभा ग्रामीण भागात ग्रामपंचायत निहाय चौक सभांचे आयोजन करून मोदी सरकारच्या १२ वर्षातील ऐतिहासिक निर्णय व कामगिरीची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विषयी विधानसभा सदस्यांनी शिबिलरे आयोजित करण्यात असून त्या ठिकाणी आमदार खासदार विधान परिषद सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर डिजिटल प्रतियोगिता यानुसार लहान व मोठे व्हिडिओ चित्रात्मक ग्राफिक्स संबंधित स्पर्धा आयोजित करणे, जिल्हा सेवा परीक्षण करून पुरस्कार विजेत्या पुरस्कार देणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक ऐतिहासिक निर्णय व कामगिरीची प्रदर्शनी या लावणे मीडिया चॅनेल youtube वर मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे व्हिडिओ तयार करणे ते सोशल मीडिया प्रसारित करणे सरकारच्या कामगिरीची प्रदर्शनी साहित्य पीपीटी पुस्तिका व पत्रके कार्यक्रमापूर्वी तयार करणे अशा कार्यक्रमाचे आयोजन असून २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस या दिवशी खाजगी संस्थांच्या सहकार्याने पाच दिवसांचे मंडल स्थानि किमान एक योगा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंडलस्थानी राजकीय सामाजिक संस्था कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने ५ जून पासून पुढील दोन महिने पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व बीज प्रत्यारोपण अधिक कार्यक्रमांचे व्यापक अभियान करून मंडळ व शहरी भागात प्रभाग व ग्रामीण भागात ग्रामीण पंचायत स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.२५ जून आणीबाणी या पन्नास वर्षे पूर्ण होणार असून २५ जून २०२५ या दिवशी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणी (काळा दिवस) ५० वे वर्षे आहे. काँग्रेसने देशवासीयांवर गेलेले अत्याचार लोकशाहीची केलेले अत्याचार आजही लोकांच्या मनात जिवंत असून या विरोधात जिल्हास्तरावर काळा दिवस म्हणून पाळायचा आहे यावेळी आणीबाणी संबंधी माहिती देऊन या विषयासंबंधी चर्चा असेल तर आयोजित करून आणीबाणी मध्ये अटक झालेल्यांना सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात देण्यात आली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या २३ जून या दिवशी वाढदिवसाच्या औचित्य साधून देवगड तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या शैक्षणिक साहित्य वाटप, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कामगारांना रेनकोटचे वाटप त्याचप्रमाणे ठिकठिकाणी ग्रामदेवतेच्या मंदिरात पालकमंत्री यांना दीर्घायुष्य लावावे याकरिता अभिषेक करण्यात येणार असून तालुकास्तरीय विविध उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली.यावेळी जिल्हा निमंत्रित बाळ खडपे ,प्रकाश राणे, भाजपा, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर ,तालुकाध्यक्ष राजा भुजबळ राजू शेट्ये महिला अध्यक्ष उषाकला केळुस्कर मंडल संयोजक वैभव करंगुटकर आदी उपस्थित होते.