LIVE UPDATES

निवडणूक नायब तहसीलदार ऑन ड्युटी गायब

साबाजी सावंतांनी केली पोलखोल
Edited by: लवू परब
Published on: June 18, 2025 22:00 PM
views 267  views

दोडामार्ग : गेले कित्येक महिने दोडामार्ग तहसील चा अनागोंधी कारभार सुरु आहे. तहसीलदार 5 ते 6 महिन्यांपासून रजेवर आहेत. निवडणूक नायब तहसीलदार ऑन ड्युटी रूमवर आराम करतात. याचा ऑन कॅमेरा स्पॉट पंचनाम साई सेवा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी केला. यात ते 4.30 वाजता रूमवर असल्याचे निष्पन्न झाले. मग हे अधिकारी घरी बसून शासनाचा पगार खातात काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून याबाबत आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे व्हिडीओ व फोटो सहित तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिरी आशिकी  गेले कित्तेक दिवस दोडामार्ग तहसीलदार कार्यालयाचा अनागोंदी कारभार सुरु आहे. कामासाठी याठीकाणी आलो असता काम होत नाहीत. आम्ही दिव्यांग बांधव असल्याने गेले कित्तेक दिवस निवडणूक कार्डच्या कामासाठी या ठिकाणी येत होतो मात्र आलेल्या वेळी या ठिकाणी असणारे निवडणूक नायब तहसीलदार हे केव्हाच आपल्या खुर्ची वर किंवा कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे तासंतास वाट बघून आम्हा दिव्यांग बांधव व इतर जनतेला काम होण्याआधी परतून जावे लागते. याचा आम्हाला आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो.

बुधवारी सावंत हे दुपारी 3.00 वाजता दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक कार्ड च्या कामा संबंधित आले होते. त्यांच्या सोबत दिव्यांग महिला होत्या. त्यांनी निवडणूक नायब तहसीलदार कुठे गेलेत या बाबत निवासी नायब तहसीलदार संजय मद्रे यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी ते जेवायला गेले असल्याचे श्री.मद्रे यांनी सांगितले जेवायला गेले असले तरी आता 4.30 वाजले अजून जेवत आहेत काय ? सरकारी कार्यालयाच कामाकाज करण्याचा वेळ काय मग ते अजून घरी काय करत आहेत अशे अनेक प्रश्न सावंत यांनी उपस्थित करून निवासी नायब तहसीलदार यांना धारेवर धरले. यावेळी  सावंत हे अधिक आक्रमक झाले व त्यांनी थेट निवडणूक नायब तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता ते रूमवर असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी सावंत बोलें की मी तीन वाजता या ठिकाणी निवडणूक कार्ड संदर्भात आलो होतो आमच्या दिव्यांग बांधवांच्या समस्या आहेत त्या संदर्भात याठीकाणी आलो आहे आता 4.30 वाजले तुम्ही कोठे आहात असा विचारलं असता निवडणूक नायब तहसीलदार व्ही एच राजुरे यांनी आपण रूमवर असल्याचे सांगितले यावेळी माझ काम आहेत मी तुमच्या रूमवर येऊन सांगू काय अस सावंत यांनी फोनवरून विचारलं या संदर्भात तुमचा मनमानी कारभारा बाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


दोडामार्गला वाली कोण  ? 

 सावंत बोलताना म्हणाले की दोडामार्ग तहसील कार्यालयाचा दिवसेंदिवस भोंगळ कारभार सूरु आहे. मुख्य तहसीलदार अमोल पोवार हे 5 ते 6 महिन्यांपासून रजेवर आहेत. ते नसल्यामुळे सर्व जनतेचे हाल होत आहेत. तसेच निवडणूक तहसीलदार, पुरवठा विभाग मध्ये कर्मचारी नाही या सर्व गोष्टीमुळे इथल्या जनतेला मोठा आर्थिक तसाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खरोखरचं दोडामार्गला वाली कोणी नाही काय? असा पडलेला प्रश्न पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी दूर करून आम्हा जनतेला न्याय द्यावा असे सावंत यांनी सांगितले.

यावेळी निवडणूक नायब तहसीलदार यांना या संदर्भात विचारणा केली असता माझ काहीही म्हणण नाही ते जर माझी कोणाकडे तक्रार करणार म्हणतात तर मी आता काय बोलू अस निवडणूक नायब तहसीलदार व्ही एच राजुरे म्हणाले.