
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांना रक्ताची तातडीने गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आणि रक्ताची गरज भागवण्यासाठी सावंतवाडीत युवा रक्तदाता संघटनेकडून विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांच्या वतीने गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असल्याने, नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले आहे. रक्तदानासाठी इच्छुक दात्यांनी किंवा अधिक माहितीसाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष . देव्या सूर्याजी यांच्याशी 9922088238 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन पवित्र दान करावे करावे असे आवाहन करण्यात आलं आहे.










