
कणकवली : देशभरातील मेडिकल व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन पुकारले असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कणकवली तालुक्यातीलही मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व तालुक्यातील सर्व 175 मेडिकल्स मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून ते बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

दरम्यान, कणकवली तालुक्यातील सर्व मेडिकल व्यवसायिक बुधवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र झाले. सर्व व्यवसायिकांनी आपल्या दंडावर काळ्याफिती बांधल्या तसेच पांढरे कपडे परिधान केले होते. त्यानंतर सर्व व्यावसायिक मिळून मोर्चासाठी ओरोसच्या दिशेने रवाना झाले. याप्रसंगी कणकवली केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय घाडी यांच्यासह जेष्ठ मेडिकल व्यवसायिक बाळासाहेब डोरले, राजू मापसेकर, संजय पाध्ये, जिल्हा संचालक नंदू उबाळे, विवेक आपटे, मकरंद घळसासी, विजय घाडी, मुकुंद जाधव आदी मेडिकल व्यावसायिक उपस्थित होते.










