LIVE UPDATES

ताज प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याने वेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने जल्लोष

तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी पालकमंत्री व महायुतीच्या नेत्यांचे मानले आभार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 18, 2026 19:15 PM
views 42  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्याने आता ताज प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाला व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्ल्यात फटाके फोडून व लाडू वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. 

यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी ,युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, तालुका सरचिटणीस तथा मच्छीमार सेलचे अध्यक्ष वसंत तांडेल, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, तालुका कार्यकारणी सदस्य संतोष अणसूरकर, नगरसेवक ऍड सुषमा प्रभु खानोलकर, शीतल आंगचेकर, सुधीर पालयेकर, युवराज जाधव, प्रितम सावंत, सदानंद गिरप, काजल कुबल, आकांक्षा परब, सचिन शेट्ये, शक्तिकेंद्र प्रमुख सायमन आल्मेडा, मयुरेश शिरोडकर, बूथ अध्यक्ष भानुदास कुबल, अर्जुन तांडेल, किशोर रेवणकर, देवेंद्र वस्त, श्याम खोबरेकर, नारायण गावडे, उपसरपंच अनंत केळजी, विश्वनाथ धुरी, सदानंद गावडे, मनोज उगवेकर, संतोष धानजी, युवा कार्यकर्ते मारुती दोडशानटी, तुषार साळगांवकर, हितेश धुरी, गौरेश खानोलकर, गुरु राणे, हर्ष कोचरेकर, गौरेश गावडे, योगेश सरमळकर, अमित गावडे, तनिष धोंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.