
सावंतवाडी : शहराची ओळख शांत व सुसंस्कृत शहर म्हणून आहे. कालचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आमचे कार्यकर्ते बुथवर असताना गाडी अंगावर घालण्याचा प्रकार झाला. शहरात पहिल्यांदाच युपीतील लोकांनी असा प्रकार केला असून हा विषय गंभीर आहे. ही माणसं विशाल परब यांची आहेत. गाडी देखील त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे विशाल परबांनाही अटक करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली.
ते म्हणाले, अंगावर गाडी घालण्याचा प्रकार झाला त्यावेळी गाड्या अडविण्यात आल्या असता आतील माणसं सावंतवाडीतील नसल्याच समोर आलं. ती माणसं युपीतील होती. युपीतील लोकांनी सावंतवाडीत दहशत माजवण योग्य नाही. त्यामुळे गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. एखादी गाडी आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा गाडी अडवून पोलिसांच्या ताब्यात आम्ही दिली. यावेळी बाचाबाची झाली, गाडी फोडली नाही. युपीतील ती लोक कोण ? त्यांच क्रिमीनल रेकॉर्ड आहे का ? हे बघितलं पाहिजे. त्यांनी केस केली म्हणून आम्ही केली. खोटी केस करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच नाव घातलं गेलय. कार्यकर्त्यांसाठी आम्ही धावून गेलो. दादागिरी युपीतील लोकांनी केली. तसेच पैसे वाटताना रोखल म्हणून पोलिस आमच्यावर गुन्हे दाखल करत असतील तर आनंद आहे. तसेण काहीजण तिथे विशाल परबांना वाचवायला आले होते का ? असाही सवाल त्यांनी केला. तर, महायुतीत आम्ही काम करत असून काही नेत्यांचे फोन येतात. दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण नेत्यांच काम आहे. त्यामुळे नेत्यांचे फोन होते असं मत व्यक्त केले.










