LIVE UPDATES

डॉ. विनय मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

सावंतवाडीत प्रगत दंतोपचार सुविधा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 19, 2026 12:13 PM
views 61  views

सावंतवाडी : येथील 'डॉ. विनय मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक' येथे नुकतेच ९ वर्षांच्या विशेष गरजा असलेल्या बालकावर 'IV कॉन्शियस सेडेशन'द्वारे यशस्वी दंतोपचार करण्यात आले. आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारची दंतोपचार सुविधा अत्यंत दुर्मिळ असून, त्यासाठी रुग्णांना सहसा गोवा किंवा बेळगावला जावे लागते. या रुग्णावर अवघ्या ३० मिनिटांत क्लिनिंग, फिलिंग, दात काढणे आणि आर्च एक्सपान्शनसाठी लागणारे 'डिजिटल इम्प्रेशन' रेकॉर्ड करण्यात आले.

हे यश डॉ. गुरुनाथ ए. सूर्यवंशी (MD भूलतज्ज्ञ), डॉ. सिद्धेश आजगावकर (MDS बालदंत रोग तज्ज्ञ) आणि डॉ. विनय जी. सूर्यवंशी (MDS - रूट कॅनल स्पेशालिस्ट) व त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे शक्य झाले. लहान मुलांवरील सर्व प्रकारचे उपचार येथे अत्यंत सुरक्षितपणे आणि इतर शहरांच्या तुलनेत कमी दरात केले जातात. डॉ. विनय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, येथे अनुभवी डॉक्टरांची टीम तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सज्ज आहे. येथे मिळणाऱ्या प्रमुख सुविधांत रूट कॅनल ट्रीटमेंट, दात बसवणे आणि इम्प्लांट्स, हिरड्यांचे आजार आणि दातांची स्वच्छता, वेडेवाकडे दात सरळ करणे, दात किंवा अक्कल दाढ काढणे

तसेच ब्लिचिंग व इतर सुविधा उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत मशिनरी आणि विशेष म्हणजे, तुम्हाला येथे मिळते 24 × 7 आपत्कालीन दंत सेवा उपलब्ध असून आजच आपल्या दातांच्या आरोग्यासाठी मोफत सल्ला घ्या बँक ऑफ बडोदा जवळ, डॉ. दुर्भाटकर  क्लिनिकच्या शेजारी, सावंतवाडी येथे. अधिक माहितीसाठी संपर्क 9738039412, 7378657501 करा.