आंबोली पर्यटन व्यवसायिक संघाच्या कार्याध्यक्षपदी आदर्श राऊत

सचिवपदी दीपक गावडे
Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2026 15:09 PM
views 73  views

सावंतवाडी : आंबोली पर्यटन व्यवसायिक संघ व समितीच्या कार्याध्यक्षपदी आदर्श ज्ञानेश्वर राऊत व सचिवपदी दीपक गावडे (चौकुळ - नेनेवाडी) यांची निवड नुकतीच करण्यात आलेली आहे. आंबोली पर्यटन व्यवसायिक संघ हा 'आंबोली टुरिझम'शी संलग्न आहे. 

आंबोली टुरिझम'ने आंबोली पर्यटनाला जगाच्या नाकाश्यावर नेत जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून दिले आहे. यासोबत पर्यटन विकास, रोजगार, समस्या निवारण आदीवर देखील आंबोली टुरिझमकडून विशेष कार्य पार पाडले जात आहे. आंबोली, चौकुळ, गेळे परिसरातील पर्यटन व्यवसायिकांच्या हक्कांसाठी व समस्या निवारण यासोबत पर्यटन विकास व रोजगार आदीसाठी आंबोली टुरिझम संलग्न 'आंबोली पर्यटन व्यवसायिक संघ' कार्यरत असून सदर संघ व त्या अंतर्गत समित्यांवर स्थानिक युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्याध्यक्षपदी आदर्श ज्ञानेश्वर राऊत व समिती सचिवपदी दिपक गावडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष निर्णय राऊत व उपाध्यक्ष अजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच करण्यात आलेली आहे. तर येत्या काळात विविध समित्यांच्या पदांवर देखील युवा पिढीला प्रामुख्याने स्थान देण्यात येणार आहे. तसेच नव्या पर्यटन व्यवसायिकांची नोंदणी सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अजय राऊत यांनी दिली आहे.

यावेळी आंबोली, चौकुळ, गेळे परिसरातील पर्यटन व्यवसायिकांच्या हितासाठी शक्य तो सर्व प्रयत्न करणार असल्याचे कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर आदर्श राऊत याने सांगितले. तर महत्वाच्या आंबोली पर्यटन व्यवसायिक संघाच्या कार्याध्यक्षपदी आदर्श राऊत व सचिवपदी दीपक गावडे यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून विशेष अभिनंदन केले जात आहे.