
मालवण : बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अनधिकृत व्यवसाय थाटल्याने रस्त्यावरून चालणेही मुश्किल बनले आहे. त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिक राजन भोजणे यांनी नगरपरिषद आणि शिवसेना शहर प्रमुख दीपक पाटकर यांच्याकडे केली होती. भोजणे यांच्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने संबंधित फेरीवाल्यावर कारवाई करत रस्ता मोकळा केल्याने भोजणे यांनी पालिका प्रशासन आणि दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत.
मालवणच्या अरुंद रस्त्यावर परप्रांतीय फेरीवाले आपला व्यवसाय थाटत आहेत. त्यामुळे जनतेला रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. फेरीवाले हे दिवसेंदिवस वाढत चालले असून भविष्यात मुंबई सारखी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. म्हणून मी एक जागृत शिवसैनिक या नात्याने आपल्याला संभाव्य धोक्याची कल्पना देत आहे. येथे आलेल्या परप्रांतीयाना काही स्थानिक लोक साथ देत आहेत. तरी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शहर प्रमुख नगरसेवक दीपक पाटकर यांनी पालिका प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने सदर परप्रांतीयावर कारवाई केली आहे. या कारवाई बाबत भोजणे यांनी समाधान व्यक्त केले असून पाटकर आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.











