LIVE UPDATES

चंदगडमध्ये भीषण अपघात

सोनावलमधील तरुणाचा मृत्यू
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 02, 2026 18:46 PM
views 52  views

दोडामार्ग : चंदगड तालुक्यातील वाळकोली येथे झालेल्या भीषण अपघातात सोनावल येथील एका २१ वर्षे युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. शुभम डेगवेकर असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे सोनावल गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनावल येथील शुभम डेगवेकर हा दुचाकीने शनिवारी चंदगड तालुक्यात गेला होता. वाळकोली फाट्याजवळ तो पोहोचला असता समोरील टेम्पोला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, शुभमचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुभमला पोलिस व्हायचे होते. म्हणून तो कुडाळ येथील एका प्रशिक्षण केंद्रात भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता. या दुर्दैवी घटनेमुळे शुभमचे पोलिस होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. त्याच्या पश्चात आई-वडील व बहिण आहे.