
मालवण : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ एप्रिल रोजी चेतन मुणगेकर यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध विधी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुणगेकर परिवाराकडून करण्यात आले आहे.
स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सकाळी ६.३० वाजता दुग्ध अभिषेक, सकाळी ७ ते १२ वाजता समर्थांचे विधीवत पूजन, दुपारी १२.३० ते १ वाजता श्रींची आरती, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता तीर्थप्रसाद वितरण, सायंकाळी ५.३० ते ८ वाजता संगीत गायनाचा विशेष कार्यक्रम, रात्री ८ वाजता भजने,
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी होणारा संगीत गायनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर होणारी भजने अध्यात्म आणि संगीताच्या या संगमामुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुणगेकर परिवाराने सर्व भाविकांना विनंती केली आहे की, या सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून महाप्रसाद व तीर्थप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.











