LIVE UPDATES

महसूल विभागातील उत्कृष्ट २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 15:45 PM
views 105  views

सिंधुदुर्गनगरी : महसूल विभागाच्या सन २०२५-२०२६ या महसुली वर्षातील धोरणे व उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करून शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील यांचा शनिवारी (१ ऑगस्ट) येथील मायनाक भंडारी सभागृहात  पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी विविध स्तरांवर उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, महसूल सेवक, ग्राम महसूल अधिकारी, वाहन चालक, शिपाई तसेच पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

गौरव प्राप्त झालेल्यांमध्ये उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (इवद) श्रीमती आरती देसाई, तहसिलदार, वैभववाडी सूर्यकांत दत्तात्रय पाटील, तहसिलदार (महसूल) श्रीमती चैताली भास्कर सावंत, निवासी नायब तहसिलदार, सावंतवाडी रविंद्र निपाणीकर, लघुलेखक (नि.श्रे.), उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ महेश जाधव, सहायक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ श्रीमती संजीवनी किशोर खानोलकर, वैष्णवी विवेक देसाई, मंडळ अधिकारी विनायक सुधाकर कोदे, महसूल सहायक महादेव शिवाजी बाबर, ग्राम महसूल अधिकारी गिर्ये शांतेश गिरीश नाडकर्णी, ग्राम महसूल अधिकारी वझरे किरण कैलास अभंग, ग्राम महसूल अधिकारी मालवण गौरव प्रकाश दळवी, वाहन चालक राजेश अशोक शिरवलकर, नाईक, जिल्हाधिकारी कार्यालय रामकृष्ण नारायण जाधव, शिपाई, तहसिलदार कार्यालय देवगड अजिम अल्लीखान आगा, महसूल सेवक, सजा लोरे सुरेंद्र भिकाजी पेडणेकर, महसूल सेवक, सजा सासोली संतोष दशरथ नाईक, महसूल सेवक, सजा कट्टा योगेश लक्ष्मण वेंगुर्लेकर, पोलीस पाटील, जानवली मोहन श्रीकांत सावंत, पोलीस पाटील, पिंगुळी वैभव वसंत धुरी तसेच पोलीस पाटील, दाभोली जनार्दन पेडणेकर यांचा समावेश आहे.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेला तत्पर, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देत शासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान हा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.