
देवगड : संजय गांधी योजना समितीच्या बैठकित एकूण 13 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये संजय गांधी विधावा निराधार योजनेचे तीन प्रस्ताव, दिव्यांग लाभार्थ्यांचे तीन प्रस्ताव, श्रावणबाळ योजनेचे आठ प्रस्ताव असे तेरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
देवगड तालुका संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष मिलिंद साटम यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार देवगड यांचे दालनात दि. २६.०५.२०२६ रोजी लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिस सदस्य सचिव तथा तहसिलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी संतोष बिर्जे, देवगड जामसंडे नगर पंचायतीचे .बूचडे, समिती सदस्य दिलीप वाडेकर, वैभव करंगुटकर, प्रकाश राणे आदी उपस्थित होते. समितीच्या वतीने तहसिलदार रमेश पवार यांच्या उत्कृष्ट कामकाजाचा आढावा घेवून सर्वांनी कौतूक करण्यात आले.
संजय गांधी समितीच्या बैठकित शिल्पा श्रीधर अनभवणे रा.शिरगांव, अनिता अनिल घाडी रा.दहिबांव, ऋतूजा राजेंद्र लाड रा.वाघिवरे, सुबाण अमिन चौगुले रा.रामेश्वर, नवनाथ लक्ष्मण जंगले रा.गोवळ, मयुर अनंत मणचेकर रा.पडेल, सिताबाई भिकाजी फाळके रा.गोवळे, विजय गोविंद दळवी रा.तळवडे,सुलोचना मोहन कडू रा.तळवडे,सुधिर जगन्नाथ मांजरेकर रा.नारिंग्रे, विश्वनाथ सोनू चव्हाण रा.इळये, प्रकाश रघुनाथ राणेरा.हिंदळे, लक्ष्मीबाई रामचंद्र फाले रा.पाटगांव आदी लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करएययात आले.
संजय गांधी योजनेंतर्ग लाभ मंजूर लाभार्थ्यांनी आपला एक पासपोर्ट साईजचा फोटो, बॅंक पासबूक झेरॉक्स ,आधार कार्ड व दिव्यांग असल्यास UDID कार्डच्या झेरॉकसह संजय गांधी योजना शोखेत संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.










