
देवगड : मुणगे येथे २ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधीत श्री देवी भगवती मातेचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने दैनिक कोकण सादच्या माध्यमातून जत्रोत्सव विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर उपस्थित होते. तसेच विश्वस्त प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, मनोहर मुणगेकर, अनिल धुवाळी, वसंत शेट्ये, कृष्णा सावंत, रामचंद्र मुणगेकर, लेखनिक रामतीर्थ कारेकर, भक्तनिवास व्यवस्थापक दत्ताराम आईर, देवदत्त पुजारे, दिगंबर पेडणेकर, विश्वास मुणगेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
जत्रोत्सव विशेष पुरवणीत देवीच्या महात्म्याबरोबरच देवस्थानाचा इतिहास, धार्मिक कार्यक्रमांची माहिती तसेच जत्रोत्सवातील विविध उपक्रमांचा आढावा देण्यात आला आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने मुणगे परिसरात भक्तांची मोठी गर्दी होत असून धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.











