
कणकवली : कणकवली शहरातील तेली आळी परिसरात, कस्टम ऑफिस समोर असलेली गटर लाईन पूर्णतः चोकप झाली असून सांडपाणी साचून राहिले आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अत्यंत त्रस्त झाले आहे.
सांडपाणी उघड्यावर साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे तसेच पाणीजन्य व संसर्गजन्य आजार (उदा. ताप, डेंग्यू, मलेरिया, पोटाचे आजार) पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. तरी सदर गटर चोकप तातडीने साफ करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, तसेच परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशीच मागणी परिसरातील नागरिक करत आहेत











