JOBS | पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी, जाणून घ्या..

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 04, 2023 10:56 AM
views 567  views

ECGC Bharati 2023 : एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC Ltd.) अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती

या भरती अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची मुदत सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. दरम्यान, अंतिम मुदतीनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वयोमर्यादा- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 28 ते 30 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क- या भरतीसाठी SC/ST/PWBD उमेदवारांसाठी रु. 175/- इतका अर्जशुल्क आकारला जाणार असून, इतर सर्वांसाठी रु. 850/- इतका आकारला जाणार आहे.

अर्ज पद्धती- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, यासाठी अर्ज करण्याची मुदत सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023 ही आहे.

अर्ज कसा करावा- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, भरती संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.ecgc.in ला भेट द्यावी.


वेतन- 

प्रोबेशनरी ऑफिसर – Pay scale of 53600-2645(14)-90630-2865(4)-1,02,090