JOBs NEWS | 12 वी पास झालाय ? जॉबच्या तयारीला लागा

Edited by: ब्युरो
Published on: March 23, 2023 11:01 AM
views 562  views

JOBs NEWS | स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी आयोगाकडून १२ वी पास उमेदवारांसाठी ५३६९ पदांवर रिक्त जागा भरण्यासंदर्भात जाहिरात जारी केली आहे. आयोगाने पोस्ट फेज Xi परीक्षा २०२३ साठी पदभरती जाहीर केली असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ssc.nic.in या आयोगाच्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे वेगेवगेळ्या विभागात ५३६९ जागांची भरत होत असून इच्छुक उमेदवारांनी वेबसाईला भेट देऊ अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्यावी. 

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे. त्यानंतर, ३ ते ४ एप्रिलपर्यंत आपल्या अर्जात सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर, जुन-जुलै रोजी २०२३ रोजी या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. 

परीक्षा भरतीसाठी उमेदवारीसाठी अर्ज फी १०० रुपये घेण्यात येत आहे. मॅट्रिकुलेशन, हायर सेकेंडरी, ग्रेज्युएट आणि पदव्युत्तर स्तरावरील शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवारांना पदभरतीसाठी वस्तुनिष्ठ प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नांच्या तीन वेगवेगळ्या कॉम्प्युटर आधारित परीक्षाही होणार आहेत. उमेदवार  परीक्षा पॅटर्न, सिलॅबस आणि पोस्‍ट वाइस निर्धारित पात्रतेची पूर्ण माहिती वेबसाईटवरील नोटीफिकेशनमध्ये पाहता येईल.