तोंड येणं म्हणजे नेमकं काय होतं?

वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार
Edited by: ब्युरो
Published on: August 21, 2023 12:39 PM
views 1406  views

तोंड येणं म्हणजे नेमकं काय होतं?

तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरडया, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णत: लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. अशा वेळी तोंडातून गरम वाफा निघाल्याचं जाणवतं. जिभेच्या कडा खडबडीत होतात. तिथेही फोड येतात. कधी कधी ताप येतो किंवा अंगात कणकण जाणवते.

 पचनसंस्थेवर ताण पडून शौचाच्या तक्रारीही निर्माण होतात. त्याचबरोबर भूक मंदावणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, इतर आजरावर सामोरे जावे लागतं. यासारख्या तक्रारी वारंवार तोंढ येण्याचे दिसून येतं. वारंवार तोंड आल्यामुळे अपचन, जुलाब, मोठया आतडयाचे विकार, मानसिक ताणतणाव अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं.

थोडक्यत शरीरातील ब गटातील जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी झालं की त्याचा मज्जा पेशींवर परिणाम होतो. त्वचा, ओठ, गालाचा आतील भाग, जीभ आणि घसा असे पचनसंस्थेतील महत्त्वाचे पाचकरस करणा-या ग्रंथी तसंच रक्त तयार करणा-या ग्रंथींचं जीवनसत्त्व बी गटामुळे होत असतं. मात्र या जीवनसत्त्वांच्या अभावाने खंड पडतो. आणि त्यांचं कार्य बिघडतं त्यामुळे तोंड येतं.


तोंड येण्याची कारणे

◼️कुपोषण

◼️आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली

◼️जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता

◼️दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे,

◼️दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे,

◼️कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे

◼️तंबाखूम दारू, गुटखा याचं सेवन करणे

◼️मानसिक ताणतणाव

◼️अपुरी झोप

◼️अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे

◼️कमी प्रतिकारशक्ती

◼️जीवनसत्त्वांची कमतरता

◼️वारंवार टुथपेस्ट बदलणे

◼️कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं.

तोंड येऊ नये म्हणून काय कराल?

◼️तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता

◼️पान, तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक घोष्टींचं सेवन पूर्णपणे बंद करावं

◼️आहारात जीवनसत्त्व आणि चोथायुक्त पदार्थाचा समावेश करावा.

◼️भरपूर पाणी प्यावं. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे

◼️पुरेशी झोपही आवश्यक आहे. रात्रीच्या जागरणाने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेही तोंड येतं. म्हणून किमान सहा ते सात तास झोपणं आवश्यक आहे.

◼️तणावरहीत जगणं आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा मनावर ताण आल्याने त्याच्या परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो.

◼️तोंड आलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावावं. आणि लाळ थुकून टाकावी. तोंडात कात धरल्यानेही आराम पडतो. मात्र त्वरित आराम न पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

शरीराला आवश्यक जीवनसत्त्व कोणती?

» बी १ अर्थात थायमिन

» रायबोफ्लेवीन

» नायसीन


ही जीवनसत्त्व कोणत्या पदार्थातून मिळतील?

थायमिन : सर्व प्रकारची तृणधान्य, हातसडीचा तांदूळ, कोंडयासकट गहू, मोड आलेली कडधान्य, ज्वारी आणि बाजरी.

रायबोफ्लेवीन : दूध, तृणधान्य, डाळी यातून अधिक प्रमाणात मिळतं.

गर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉड ग्रंथीचे आजार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते.

नायसीन : संमिश्र आहार. तृणधान्य आणि दूध.

वारंवार तोंड येत असेल तर त्याची वर नमूद केल्याप्रमाणे बरीच कारणे आहेत..

तोंड अगदी लहान बाळाचे ही येते . दूध पिल्यानंतर तोंडाची व्यवस्थित स्वच्छता नाही केली तर.. 

किंवा एखादी व्यक्ती काही कारणास्तव औषधे घेत असेल तर, एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल तर अशी विविध कारणे असतात.