
दोडामार्ग : परमे पणतुर्ली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पणतुर्ली गावचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व सदस्य सुनील गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माजी उपसरपंच सौ. दिया गवस यांनी राजीनामा दिल्याने तेथील पद रिक्त झाले होते. या उपसरपंच पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली. यात सुनील गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला सरपंच प्रथमेश मणेरीकर, सदस्य शैलेश बोर्डेकर, निश्चल परमेकर, संजना सावंत, सुचित्रा गवस उपस्थित होते.
परमे पणतुर्ली ही ग्रुप ग्रामपंचायत असून गवस हे पणतुर्ली गावाचे रहिवासी आहेत. गावातील सर्व सामाजिक कार्यात त्यांचा मोठा पुढाकार असतो. नुकत्याच पार पडलेल्या पडलेल्या पणतुर्ली गावच्या श्री देवी सातेरी देवीच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यांना गावकरी व सहकारी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी बिनविरोध उपसरपंच पदावर काम करण्याची संधी दिल्याने ग्राम विकासाला अधिक चालना मिळणार असून ग्रामवासियांतून त्यांचं अभिनंदन होतंय.
विद्यमान सरपंच प्रथमेश मणेरीकर, निश्चल परमेकर व सहकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी विष्णू सावंत कर्मचारी शिवाजी सावंत व अपर्णा नाईक यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.