अहमदाबाद : नुकताच भारतातून ‘चेल्लो शो’ हा गुजराती चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटाला ऑस्कर नामांकन सुद्धा मिळाले. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता बालकलाकार राहुल कोली याने जगाचा निरोप घेतला. बालकलाकार राहुल कॅन्सरने त्रस्त होता. राहुलच्या वडिलांनी सांगितल्यानुसार त्याला वारंवार ताप येत होता. त्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. दरम्यान बालकलाकार राहुलचा शेवटचा चित्रपट तीन दिवसांनी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.
बालकलाकार राहुल हा केवळ 15 वर्षांचा होता आणि 2 ऑक्टोबर रोजी ल्युकेमियामुळे अहमदाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. राहुल कोलीच्या वडिलांनी सांगितले की, ‘राहुलने रविवारी नाश्ता केला आणि त्यानंतर त्याला सतत ताप येत होता. त्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. राहुलला होत असेलला त्रास पाहून आमचे कुटुंब पूर्णबापाने तुटून गेले होते. राहुलचा शेवटचा चित्रपट आम्ही सगळे नक्की पहाणार असंही त त्याचे वडील म्हणाले. राहुलचा चित्रपट ‘छेल्लो शो’ हा 14 ऑक्टोबरला राहुलच्या अंत्यसंस्कारा दिवशी प्रदर्शित होत आहे.
‘चेल्लो शो’ या चित्रपटाचे नाव ‘द लास्ट शो’ असेही आहे. या चित्रपटात राहुल कोली व्यतिरिक्त भाविन, ऋचा मीना, भावेश श्रीमाली, परेश मेहता आणि टिया सबेचियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आत्तापर्यंत ज्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला आहे, त्यामध्ये राहुल कोलीच्या कामाचे खूप कौतुक करण्यात आले होते. तर नलिन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.