
कणकवली : वरवडे येथून मालवणला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेली मुस्कान अब्दुल सोलकर (२०, रा. मालवण) ही युती बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर मुस्कान हिची मावस बहीण कौसर जहीर अब्बास ठाकूर ३०, रा. वरवडे खालची मुस्लिमवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
खबरीनुसार मुस्कान ही कौसर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी राहायला आली होती. बुधवारी सकाळी ११.४५ वा. सुमारास ती आपल्या मालवण येथील घरी जाण्यासाठी कौसर यांच्या घरातून बाहेर पडली. मात्र दुपारी १.३० वा. सुमारास कौसर यांना आपली मावशी तथा मुस्कान यांच्या आईचा फोन आला. मुस्कान अद्याप घरी पोहोचली नसल्याचे कौसर यांना मावशीने सांगितले. पुढं शोध घेऊनही मुस्कान न सापडल्याने अखेर कौसर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ताची खबर दिली.
मुस्कान याची उंची ५ फुट ३ इंच, अंगाने सडपातळ, रंग निमगोरा, चेहरा उघड, केस काळे व लांब, अंगात जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व त्यावर पांढऱ्या रंगाचे डिझाईन, पायात काळे सॅंडल असून तिच्याकडे ओपो कंपनीचा मोबाईल आहे. अशा वर्णनाची युवती आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.










