
कणकवली : अत्यवस्थ झाल्याने आधी कणकवली उपजिल्हा रुग्णालय व तेथून ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सदानंद यशवंत चव्हाण (६५, कणकवली - सिद्धार्थनगर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदानंद यांना बुधवारी रात्री १.३० वा. सुमारास छातीत दुखू लागले. कुटुंबियांनी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून सदानंद यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंबियांनी सदानंद यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे पहाटे ३.२५ वा. सुमारास सदानंद यांचा मृत्यू झाला. याबाबत सदानंद यांचा मुलगा विनायक सदानंद चव्हाण (१९, कणकवली - सिद्धार्थनगर) याच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.










