पणजी : चित्रपटनिर्मितीतील संशोधनाची भूमिका महत्त्वाची असते. मी निर्मितीपूर्वी केलेले संशोधन आज माझ्या चित्रपटांचा आधारस्तंभ आहे. एकूणचसृष्टीत निर्मितीमधील संशोधन हेच खरे युनिक सेलिंग पॉइंट (यूएसपी) ठरत आहे. कथाकथन, कथनाची सखोलता आणि सत्यता समृद्ध संशोधन आवश्यक असते, असे मत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केले.
बुधवारी इफ्फीच्या 'इन कॉन्व्हर्सेशन' या सत्रात त्यांनी चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक, तरण आदर्श यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपट कला, चित्रपट निर्मितीतील बारकावे, कथाकथनाला आकार देणारी आव्हाने आणि प्रेरणा गोष्टींवर चर्चा केली. वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या भांडारकर यांनी अस्सल कथाकथनाचे सार आणि सिनेमॅटिक सृष्टीतील गुंतागुंत यावर प्रकाश टाकला.
भांडारकर म्हणाले की, चित्रपट एका कल्पनेतून निर्माण होतो. सिनेमॅटिक लँडस्केपमध्ये वास्तववादी सिनेमाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. वास्तववादी चित्रपटांमध्ये कलात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्यादेखील प्रेक्षकांपर्यंत जाण्याची शक्ती असते. बॉक्स ऑफिसच्या यशासाठी कोणताही सिद्धांत नाही. आर्थिक गणिते आव्हाने उभी करू शकतात. मात्र इच्छुक चित्रपट निर्मात्यांनी दृढनिश्चयाने काम केले पाहिजे.
सर्जनशीलतेसाठी विश्वास गरजेचा! चित्रपट निर्मिती हा एक ऑरगॅनिक प्रवास असतो. जिथे अपयश यशाच्या दिशेने एक पायरी म्हणून काम करते. उत्कृष्ट कलाकृती तयार करण्यासाठी असे असणे आवश्यक आहे. चित्रपटसृष्टीत सर्जनशीलता आणण्यासाठी अतूट विश्वासाची गरज असते. हा सोपा मार्ग नाही. परंतु पटकथेवर आणि स्वतःवर विश्वास ठेवणे ठेवल्यास हे शक्य आहे.