
कुडाळ : निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह, ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य आणि बहारदार खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाने आडेली येथील दसरोत्सव सोहळ्यात रंगत आणली. उत्तरोत्तर हा सोहळा गर्दीने फुलून गेलेल्या रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला.
दसरोत्सवानिमित्त श्री देव सोमेश्वर सातेरी व इतर परिवार देवता पंचायतन समिती-आडेली (ता.वेगुर्ले) यांच्या सौजन्याने रविवारी श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली"दसरा विशेष कार्यक्रम" आयोजित करण्यात आला होता. निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह ,फुगडी नृत्य ताराराणी फुगडी मंडळ, केळूस, महिलांसाठी खास आकर्षण खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन श्री देव सोमेश्वर मंदिराच्या रंगमंचावर करण्यात आले होते दसरा विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मानकरी जयवंत धर्णे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व चेअरमन सोसायटी आडेली श्री. प्रकाश गडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सच्चिदानंद धर्णे, खजिनदार सुरेश धुरी,अरुण धर्णे,आप्पा ठाकूर तंटामुक्ती गाव आडेली अध्यक्ष अविनाश तोरस्कर पुरुषोत्तम धर्णे, रवींद्र धर्णे, संतोष घाडी, अंकुश धर्णे, मिलिंद धर्णे, धोंडू धर्णे फक्रो आडेलकर, शासकीय लेखापाल राकेश धर्णे उदय आडेलकर अभय शेलटकर, शुभम धुरी देवस्थानचे प्रमुख मानकरी, गावकर, ग्रामस्थ व देवस्थान कमिटी-आडेली आदी उपस्थित होते.
या सोहळ्याची सुरवात नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेशवंदनाने करण्यात आली. यावेळी मृणालसह गावातील बाल कलावंतानी विविध नृत्याविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये भक्ती आडेलकर ,स्वरा धर्णे धन्या धर्णे,मैथिली हळणकर, केतकी धर्णे आराध्या धर्णे, स्वरा नाईक ,रेनिषा आडेलकर ,हर्षदा धर्णे स्नेहा राणे ,आर्या राणे ,सानवी सावंत या चिमुकल्यांनी नृत्याविष्कार केला. या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन खवणे येथील निवेदक अभय शेलटकर यांनी केले. सर्व कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर श्रीमती सुषमा केळुसकर संचलित ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य सादर झाले. लोककलेतील फुगडी नृत्य रसिकांचे मनोरंजन करणारे ठरले. बहारदार पैठणी कार्यक्रम रंगला . महिलांच्या कलागुणांना वाव देणारा हा पैठणी कार्यक्रम महिलांमध्ये उत्साह देणारा ठरला.पैठणीच्या मानकरी श्रीमती राधिका नाईक हिने मिळवला तर दुसरा क्रमांक श्रीमती कोरगावकर व तिसरा क्रमांक श्रीमती खरात या महिलांनी मिळवला निवेदन शुभम धुरी यांनी केले उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उदय आडेलकर यांनी केले. आडेली गावातील ग्रामस्थ यांच्या मनोरंजनसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान कमिटीने केले होते. गावातील महिलांनी या सोहळ्यात सहभाग घेतल्याबद्दल कमिटीमार्फत धन्यवाद व्यक्त करण्यात आले . उदय आडेलकर यांनी आभार मानले.