
कुडाळ : कुडाळ येथील गुरुप्रसाद कॉम्प्लेक्समधील पार्किंगमधून दि. २१/१०/२०२५ ते २२/१०/२०२५ दरम्यान १ लाख रुपये किंमतीची TVS रायडर (MH ०७ AU ६१०१) ही मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी पूर्वा पुरुषोत्तम नाईक (वय १९) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजि.नं. ३५९/२०२५ अन्वये कलम ३०३(२) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.










