
सावंतवाडी : दिवाळीच्या मंगलमय पर्वात, लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या 'दिपोत्सवाचा' आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने 'अभंग रिपोस्ट' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीची जय्यत तयारी सुरू असून भक्ती आणि संगीताच्या या सुंदर मिलाफात सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले आहे.
हा भक्ती-संगीतमय कार्यक्रम दिवाळीची सायंकाळ अधिक श्रवणीय आणि उत्साहाची करणार आहे. आज २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ८:०० वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून भाजप युवा नेते विशाल प्रभाकर परब यांची ही संकल्पना आहे. या भक्तीमय दिवाळीच्या संध्याकाळचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.