ब्युरो न्युज : 'पुष्पा'च्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्कंठा वाढत असतानाच, प्रॉडक्शन हाऊसने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे, जे पाहून 'पुष्पा' कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत. अशातच, ही व्हिडिओ पाहून पुष्पा फ्रँचायझीचा पुढील चित्रपट 'पुष्पा-द रुल'ची अधिकृत घोषणा असल्याचे अंदाज सिनेप्रेमींद्वारा लावले जात आहेत. हा क्रिप्टिक व्हिडिओ सूचित करतो की पुष्पा तिरुपतीमध्ये तुरुंगातून पळून गेला असून आता बेपत्ता आहे.
डिसेंबर 2021 मध्ये, पुष्पा राज नावाचा जन्म झाला ज्याने संपूर्ण देशाला वेड लावले. सर्व अडथळे आणि सीमा ओलांडून देशभरातील प्रेक्षकांशी कनेक्ट केले. छोट्या शहरातील रस्त्यांपासून ते क्रिकेट स्टेडियम, राजकीय रॅली आणि कॉर्पोरेट बोर्ड रूम्सपर्यंत, त्याचे डायलॉग्स गाजले, ज्यामुळे पुष्पा पॉवरहाऊस भारतीय सामान्य लोकांचे प्रतीक बनला. इतकंच नव्हे, तर मुरादाबादमधील लग्नसोहळ्यात आणि इबीझामधील क्लबमध्येही चित्रपटाची गाणी वाजवण्यात आली. आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'च्या वेधक अवताराने संपूर्ण देशाला चित्रपटासाठी एकजूट केले आणि त्या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला. असे म्हणता येईल की, 'पुष्पा: द राइज'हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येकाला वाटणारी भावना आहे.
अशातच, "द हंट फॉर पुष्पा"या अनोख्या कॉन्सेप्ट व्हिडिओसह, निर्माता मायत्री मूव्हीज ने चाहत्यांना पुष्पा कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. हा व्हिडिओ उद्या सकाळी म्हणजेच आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आधी रिलीज केला जाईल.
'पुष्पा: द रूल' स्पष्टपणे त्या चित्रपटासारखा दिसतो जो केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर दर्शकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करत संपूर्ण भारतातील चित्रपटासाठी एक नवी पातळी स्थापित करेल.