भारतीय प्रेक्षक बिग बजेट चित्रपट आणि सुपरहिट फ्रँचायझींबद्दल नेहमीच उत्सुक असतात. तसेच, नवनवे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत असतात. बॉक्स ऑफिसवर दर शुक्रवारी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्यातील काही चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतात . अशातच, दर्शकांमध्ये उत्सुकता वाढत असताना, ओरमॅक्स (Ormax) मीडियाने आपल्या आगामी 'मोस्ट अवेटेड फिल्म्स' आणि अल्लू अर्जुन अभिनित 'पुष्पा 2: द रुल'चे रिपोर्ट कार्ड शेअर केले आहे. 'पुष्पा: द राइज'द्वारा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने पूर्ण भारताला वेड लावले आहे. 'ओ अंतवा', 'श्रीवल्ली' आणि 'सामी सामी' यांसारखी गाणी या वर्षातील सुपरहिट गाणी ठरली असून, यांना आजही प्रेक्षकांचा उत्तर प्रतिसाद मिळत आहे.
हे आहेत 'मोस्ट अवेटेड फिल्म्स'
ओरमॅक्स (Ormax) मीडियाने सोशल मीडियावर आपल्या 'मोस्ट अवेटेड फिल्म्स'ची यादी शेअर केली, ज्यामध्ये या क्रमाने चित्रपटांचा समावेश आहे: 'पुष्पा 2', 'पठाण', 'टायगर ३', 'जवान' आणि 'डंकी'. कॅप्शनमध्ये, त्याने लिहिले "#OrmaxCinematix मोस्ट अवेटेड हिंदी चित्रपट, 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत (फक्त डिसेंबर 2022 नंतर प्रदर्शित होणारे चित्रपट ज्यांचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेला नाही)"
अलीकडेच,' पुष्पा २'च्या निर्मात्यांनी शुभ मुहूर्तावर पूजा समारंभ करून चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट भव्य असेल याची हमी दिली असतानाच, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढली आहे.