कोलंबिया विद्यापीठात डॉ. अनिल सरमळकर यांचे व्याख्यान

Edited by: ब्युरो
Published on: November 05, 2022 20:29 PM
views 501  views

सावंतवाडी : आपल्या  इंग्रजी लेखनामुळे अलीकडील काळात आतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आलेले सिंधुदुर्ग जिल्यातील सरमळे गावचे सुपुत्र, आघाडीचे कवी लेखक नाटककार दिग्दर्शक डॉ. अनिल जिजाबाई सरमळकर यांना अमेरिकेतील प्रख्यात कोलंबिया विद्यापीठात  आतरराष्ट्रीय स्तरावर आपले विचार मांडण्याचा सन्मान प्राप्त होत आहे.


गेली वीस वर्षे साहित्य रंगभूमी कला समाजिक चळवळ या क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या अनिल सरमळकर यांनी नेहमीच प्रसिद्धीपासुन दुर राहत काम केले आहे. प्रगतीशील विचार आणि कला यांची सांगड आपल्या लेखनातून घालणाऱ्या अनिल सरमळकर यांची दखल प्रस्थापित प्रवाहाने कधीही घेतली नाही तसेच शोषित दलित साहित्य कला प्रवाहानेही त्यांची कधी दखल घेतली नव्हती मात्र त्यांनी आपले लेखन आणि कार्य थांबवले नाही. मात्र The fox या त्यांच्या अत्यंत वेगळ्या आणि जागतिक रंगभूमीलाही विचार करायला लावणाऱ्या या नाटकाने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. जगभरातील विद्वान समीक्षक रंगकर्मी अभिनेते दिग्दर्शक विचारवंतांनी या नाटकाचा गौरव करतांना म्हटले आहे की या नाटकाने भारतीय रंगभूमीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला एक वेगळे नाटक दिले आहे एक प्रचंड क्षमता असलेला  नाट्याचा  एक नवा रुपबंध दिला आहे. हे नाटक येणाऱ्या काळात  जागतिक रंगभूमीवर एक मानदंड बनणार आहे असे गौरवउद्गार मान्यवरानी काढले आहे. असे असतांनाच अनिल सरमळकर यांचे Aristotle Breakup हे दुसरे नाटक प्रकाशित होवु घातले असुन हेही नाटक साहित्य विचार आणि कलात्मक दृष्ट्या तेवढेच खळबळजनक असुन तेही जागतिक दर्जाचे आणि The fox या नाटकाहुन अत्यंत वेगळ्या विषयावर आधारित असुन या नाटकात अत्यंत भेदक असे प्रहसन उपहास आणि ब्लॅक ह्युमरचा वापर नाटककार अनिल सरमळकर यांनी केला असुन बुद्धीमंत वर्तुळात या नाटकाची उत्सुकता वाढली आहे.


याच पार्श्वभूमीवर अनिल सरमळकर यांच्या एकूणच वैचारीक लेखनाचीही दाखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. अनिल यांनी विपुल वैचारीक लेखनही केले असुन युरोपीय सांस्कृतिक साम्राज्यवादाची त्यांनी प्रखर समीक्षा केली आहे आपल्या लेखनात. त्यांचे वैचारीक लेखन विशेषता इंग्रजीत असुन An Orthodox, Marx Redux Marx Never died, Unending Uneven, New Theater इत्यादी त्यांनी वैचारीक पुस्तके स्वतः प्रकाशित केली आहेत तसेच बरेचसे त्यांचे वैचारीक लेखन वर्तमानपत्रे मासिके ऑनलाइन साईट इत्यादिमधुन प्रकाशित झाले आहे 


  डॉ. अनिल सरमळकर यांचे साहित्य कला रंगभूमी आणि समिक्षा तसेच आधुनिक आणि उत्तर - आधुनिक सिध्दांत तसेच जागतिक सांस्कृतिक साम्राज्यवाद आणि Deconstruct Theory अर्थात विरचना सिध्दांत याबाबतचे त्यांचे व्यापक  नवविचार मांडण्याची मोठी संधी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिकन कोलंबिया विद्यापीठाकडुन मिळणार असुन यासाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठाच्या इंग्रजी साहित्य विभागाकडुन निमंत्रित करण्यात येत आहे.


अनिल सरमळकर हे नाव फक्त रंगभूमी कविता कादंबरी दिग्दर्शन यापुरते मर्यादीत नसुन त्यांचे वैचारीक लेखनही व्यापक पातळीवर स्वीकारले जात आहे 

नव्या साहित्य कला सामाजिक सांस्कृतीक रचनेच्या दिशेने त्यांनी अत्यंत नवे विचार मांडले असुन त्यांचे वैचारीक लेखन काळाच्या पुढे आहे असे मान्यवर विद्यापीठातुन अभिप्राय दिले जात असुन अनिल यांच्या विचारांना जागतिक व्यासपीठ देण्याची संधी कोलंबिया विद्यापीठ घेत असल्याचे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाकडुन समजते आहे.


कोलंबिया विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे एक प्रमुख असलेले  मिशेल ॲडम्स यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. याबाबत त्या म्हणाल्या की वैश्विक साहित्य समीक्षा आणि नव विचार याचे सातत्याने चिंतन होणे गरजेचे आहे त्यामुळेच साहित्य आणि समाज समृद्ध होत जातो. असेच प्रयत्न संपूर्ण विचारविश्वात जगभर होत आहेत. मात्र तिसऱ्या जगातुनही अत्यंत आश्वासक अशा विचार तरूण प्रतिभा पुढे येत आहेत याचे खुप कौतुक वाटत आहे असे मुक्त विचार चिंतन आज जगाला आणि त्या त्या देशांना गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर उपेक्षित राहिलेल्या प्रतिभेला प्रकाशात आणणे ही आजची गरज आहे त्या पार्श्वभूमीवर पाहिले तर अनिल सरमळकर या भारतीय तरूण लेखक नाटककार विचारकाचे विचार प्रचंड संभाव्यता भरलेले अधिक व्यापक मुक्त आणि वेगळे असे आहेत आणि थक्क करणारे आणि तेवढेच कोणत्याही एका विचारसरणीला बांधलेले नसुन ते काळाचे विवेचन संपूर्ण मानव जातीसाठी करतात हेच त्यांचे वेगळेपण आहे म्हणुनच आम्ही अनिल यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटी मधे निमंत्रित करण्याचा विचार निश्चित करत आहोत असे मिशेल म्हणाल्या आहेत.


कोलंबिया युनिव्हर्सिटीने दिलेल्या या सन्मानपूर्ण संधीमुळे विचार व कला वर्तुळातुन  डॉ. अनिल सरमळकर यांचे अभिनंदन होत आहे. यामुळे अनिल सरमळकर यांचे विचार वैचारीक लेखनाचीही चर्चा साहित्य क्षेत्रात निश्चितच होणार असुन जागतिक पातळीवर ते तरूण विचारक म्हणुन दखल घेतले जातील.


The fox च्या यशानंतर आणि आगामी Aristotle Breakup या नाटकांच्या पार्श्वभूमीवर माझ्या वैचारीक लेखनाची विचारांची दखलही घेतली जात आहे त्यामुळे माझी जबाबदारी अधीक वाढली आहे असे मी समजतो आणि कोलंबिया विद्यापीठात जायची संधी मिळत आहे याचा आनंद आहे अर्थातच मी कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्रजी विभागाच्या मिशेल ॲडम्स आणि जेम्स ॲडम्स यांचा मनपुर्वक आभारी आहे असे अनिल सरमळकर यांनी सांगितले.