म्हैसूर मठाधीशांची मठाच्या आवारात निर्घृण हत्या...!

Edited by:
Published on: June 10, 2024 12:52 PM
views 354  views

मैसूर :  मैसूर येथील सुप्रसिद्ध अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजी (90) यांची मठाच्या आवारात चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. म्हैसूरमधील सिद्धार्थनगर जवळ बन्नूर रोडवरील अन्नदानेश्वर मठाच्या आवारात आज हे कृत्य घडले आणि संपूर्ण राज्य हादरले.

आरोपी रवी (60) याला पोलिसांनी अटक केली आहे. ते स्वामीजींचे सहाय्यक म्हणून काम करत होते. हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेवरून झालेला वाद असल्याचे कारण सांगितले जात आहे.