
सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदा पानवळ या शाळेने गतवर्षी अध्यापन निर्मितीमध्ये महाराष्ट्रात प्रथम येऊन शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पुणे येथे संचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
शैक्षणिक स्पर्धा परीक्षा गुरुकुल प्रज्ञा शोध तसेच सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या दोन्ही परीक्षेमध्ये बांदा पानवळ शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्याच्या निवड यादीत नोंद झाली. गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत इयत्ता पहिलीतील वेदा जाधव जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहावी, निरांत नांदोडकर तालुक्यात नववा,दुसरीतील आर्यन साईल जिल्हयात सातवा तर राज्यात बारावा आणि मुग्धा पेळपकर जिल्ह्यात आठवा तर राज्यात तेरावा. तसेच सिंधुदुर्ग टॅलेंन्ट सर्च परीक्षेमध्ये आर्यन साईल गोल्ड मेडल,मुग्धा पेळपकर सिलव्हर मेडल, तर परी सावंत, तानाजी वरक यानीही यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबदद्ल शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले. तसेच सर्व स्तरातून बांदा पानवळ शाळेचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी विध्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन मुख्याध्यापक मनोहर परब, शिक्षिका सुनिता कदम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले











