शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंटपदी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: May 28, 2024 08:46 AM
views 2311  views

सावंतवाडी : सावंतवाडीचा सुपुत्र शुभम विठ्ठल बांदेकर याची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंटपदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शुभमचे माध्यमिक शिक्षण मिलाग्रीज व उच्च माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल आंबोली येथे पूर्ण झाले. यानंतर पुणे येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षणाची पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. पणजी येथे भारतीय तटरक्षक दलाची पूर्व परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झाला. तदनंतर त्याची दिल्ली येथील हेडक्वार्टर मध्ये मुलाखत घेतली होती. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मार्फत राष्ट्रीय स्तरावर ही मुलाखत घेतली जाते. या परिक्षेत तो चौथ्या रॅंकने यशस्वी झाला.

 यानंतर केरळ येथील इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये त्यांने बावीस आठवड्याचे खडतर असे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. शुभमचे वडीलही सैन्यदलात होते. ते मूळचे मांगेली गावातील रहिवासी आहेत. शुभम विद्यार्थीदशेत हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचा. शांत स्वभाव मनमिळाऊ, जिद्द व चिकाटीने सातत्याने अभ्यास करून हे दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

पुढील महिन्यात केरळ येथील कोची येथे तो देश सेवेत रुजू होणार आहे.या त्यांच्या उत्तुंग भरारी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.