
कणकवली : कणकवली शहरातील हॉटेल व्यवसायिक यांच्याकडे गॅस सिलिंडर उपलब्ध नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेलांमध्ये फक्त पुढील दोन दिवस हॉटेल सुरू ठेवता येईल इतकाच गॅस साठा उपलब्ध असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात येत आहे.
गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्यामुळे हॉटेल चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लवकरात लवकर गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायासोबतच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांवरही होऊ शकतो.
संबंधित गॅस पुरवठादार तसेच प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.










