पितृसत्‍ताक नियमांमुळे लैगिंक समानता अंमलबजावणीत आव्‍हाने : प्रदिप कदम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 11, 2026 11:38 AM
views 42  views

 देवगड : महिला सक्षमिकरणासाठी भारतीय संविधानाची महत्‍वाची भूमिका असली तरी पितृसताक नियमांमुळे आजही महिलांच्‍या लैगींक समानता अंमलबजावणीत अनेक आव्‍हाने आहेत. असे स्‍पष्‍ट प्रतिपादन  कायदयांचे अथ्‍यासक प्रदिप कदम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले. प्रगती एज्‍युकेशनल गायडन्‍स असोसिएशन आणि अे. जे. वाचनालय दाभोळे यांच्‍या संयुक्‍त विदयमाने ८ मार्च रोजी  ग्रामपंचायत दाभोळे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्‍यात  आला. या कार्यक्रमा  प्रसंगी  बोलाताना  कदम  यांनी  महिलांसाठी  असलेले विविध कायदे यांचे सखोल विवेचन केले. तसेच महिला सक्षमिकरणात शिक्षण, आर्थिक स्‍वातंत्र्य राजकीय आरक्षण आणि कायदयांव्‍दारे दिलेले संरक्षण किती महत्‍वाचे आहे याची उपस्थितांना माहिती दिली.

या कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या प्रतिमेला प्रमूख अतिथी डॉ. प्रकाश पाटोदरे यांच्‍या हस्‍ते पु्ष्‍पहार अर्पण करून करण्‍यात आली. योवेळी संस्‍थेच्‍या  अघ्‍यक्षा सानिका  कदम, दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्‍ण अनभवणे, पं. स.सदस्‍या स्‍नेहा श्रीकृष्‍ण अनभवणे, दाभोळे बौध्‍दवाडी अंगणवाडी सेविकारूपा रविंद्र चव्‍हाण, मदतनीस सुनिता धोंडू अनभवणे, उपसरपंच प्राच बर्वे, केंद शाळेचे  मुख्‍याध्‍यापक पाटील, सौ.पाटील, श्री.चोपडे, सौ.जगताप सौ.म्‍हसके, ग्रामविकास अधिकारी पांडूरंग शेटगे, संस्‍थेचे पदाधिकारी प्रज्ञा प्रदिप घाडी, स्मिता भगवान दाभोळकर, मिताली विराज दाभोळकर, संचिता संतोष घाडी अनुष्‍का अरविंद नवलू, दिप्‍ती  दयानंद  घाडी प्रा. संदिप शिवराम तेली दत्‍तात्रय नारायण घाडी राज प्रदिप कदम रविना राजेंद्र घाडी गारगी गौरव चव्‍हाण गौरव चव्‍हाण प्राची रंजीत घाडी चैताली दिपक घाडी आदी प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्‍य साधून देवगड पंचायत समितीचे नवनिर्वाचित उच्‍चशिक्षीत  सदस्‍या सौ.स्‍नेहा श्रीकृष्‍ण अनभवणे आणि दाभोळे बौध्‍दवाडी अंगणवाडीच्‍या, ज्‍येष्‍ठ  अंगणवाडी सेविका श्रीम. रूपा रविंद्र चव्‍हाण  व त्‍यांच्‍या मदतनीस श्रीम.सुनिता धोंडू अनभवणे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मंडळाच्‍या वतीने भेटवस्‍तू देवून यथोचित सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी म्‍हणून उपस्थित असलेले देवगड ग्रामिण रूग्‍णलयाचे वैदयकिय अधिकारी डॉ.पाटोदरे यांनी महिलांच्‍या दृष्‍टीने आरोग्यविषयक शासनाच्‍या योजनांची सखोल  माहिती दिली. तसेच  आरोग्य विषयक सर्वोतोपरीची सेवा देण्‍याचे उपस्थित श्रोतेवर्गाला आश्‍वाशीत केले. या कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने सरपंच अनभवणे,मुख्‍याध्‍यापक श्री.पाटील,ग्रामस्‍थ  भगवान कदम, सौ.म्‍हसके,सौ.अनभवणे, श्रीम.चव्‍हाण, अध्‍यक्षा सानिका कदम यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्‍तात्रय घाडी यांनी केल.