एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी कुडाळेश्वराला साकडं

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: November 26, 2024 13:41 PM
views 50  views

कुडाळ :  पुन्हा एकदा आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी याकरिता कुडाळ मालवण मतदार संघातील महिला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी श्री देव कुडाळेश्वर महाराजांना साकडे घातले.

 विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून आता मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी याकरिता शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक आहेत. याच इच्छेने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या वतीने शिवसेनेच्या  महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ महिला तालुकाप्रमुख सिध्दी शिरसाट, रचना नेरुरकर, उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, वैष्णवी शिंदे, संगीता खांडेकर, विभाग प्रमुख परिणीता शिगले, पिंगुळी विभाग प्रमुख शमिका कुडाळकर, शाखा प्रमुख ऋतुजा कदम, ममता झोरे, किर्ती चव्हाण, मधुरा बखले, नंदा कदम, दिपीका तुळसकर अश्विनी नाईक, शुभांगी पवार, मेघा शिरसाट, ज्ञानेश्वरी सडवेलकर, जागृती तोरस्कर स्नेहा पावसकर तसेच शिवसेनेच्या इतर महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी या करिता श्री देव कुडाळेश्वर महाराज यांचेकडे साकडे घातले. 

यावेळी वर्षा कुडाळकर यांनी सांगितले की,  आता राज्यात महायुती सरकारचे बहुमत असून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे व्हावे याकरिता आम्ही सर्वजण श्री देव कुडाळेश्वर महाराजांना साकडे घातले आहे. आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच यांची निवड होईल. आमदार निलेश राणे हे आमदार होण्यासाठी मतदारसंघातील सर्व महायुतीच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आणि आज आम्हाला निलेश राणे यांच्या रूपात हक्काचा आमदार मिळाला आहे. त्यामुळे सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांचे मी आभार मानत आहे असे त्यांनी सांगितले.

 यावेळी रचना नेरुरकर यांनी सांगितले की, आमदार निलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचार प्रसार केला खूप मेहनत घेतली त्या सर्व महिलांचे मतदारांचे आम्ही आभार मानत आहोत.