आखाती देशांत १३७ भारतीय अडकले

२० नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 05, 2026 20:30 PM
views 42  views

कुडाळ | ५ मार्च २०२६ आखाती देशांमध्ये विविध कारणांमुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांची आकडेवारी समोर आली असून, सद्यस्थितीत एकूण १३७ नागरिकांची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झाली आहे. यामध्ये २० नागरिकांनी तातडीने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना आपत्कालीन मदतीची आवश्यकता आहे.

तातडीच्या मदतीची गरज असलेले नागरिक

जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आज दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार, २० नागरिक अत्यंत अडचणीत असून त्यांना त्वरित मदतीची गरज आहे. या नागरिकांचा तपशील राज्य शासनाच्या पोर्टलवर नोंदवण्यात आला आहे. या २० नागरिकांचे वास्तव्य खालीलप्रमाणे आहे:

दुबई ११

कतार २

कुवेत ४

सौदी अरेबिया १

बहरीन १

अबू धाबी १

एकूण २०

शासनाने या नागरिकांच्या मदतीसाठी आणि संपर्कासाठी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ ही लिंक उपलब्ध करून दिली आहे.

इतर ११७ नागरिकांची स्थिती

याशिवाय, इतर ११७ नागरिकही विविध देशांमध्ये असल्याची नोंद आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या नागरिकांना सध्या कोणत्याही तातडीच्या (Emergency) मदतीची आवश्यकता नाही. या नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्या दुबई (६१) आणि सौदी (११) येथील आहे. यामध्ये कुवेत, शारजा, रॅस अल खैमाह, अजमान, दोहा, इस्रायल आणि अमेरिकेतील नागरिकांचाही समावेश आहे.

महत्त्वाची सूचना: अडकलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी राज्य शासनाने दिलेल्या अधिकृत लिंकवर आपली माहिती अद्ययावत करावी, जेणेकरून पुढील मदत प्रक्रिया सुलभ होईल.