
सावंतवाडी : माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज कणकवली येथील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, आगामी विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील काही महत्त्वाच्या विषयांवरही विचारविनिमय करण्यात आला. या भेटीदरम्यान गुरु पेडणेकर, रोहित नाईक, क्लेटस फर्नांडिस, चंदन नाईक, समीर पालव आदी उपस्थित होते.










