रायगड : प्राचीन काळापासून वनस्पती आणि प्राणी या दोन्हींचा समावेश असलेल्या जैविक साधनांचा औषधी म्हणून वापर केला जात आहे. विविध प्रकारचे प्राणी व त्यांच्या विविध जातींपासून मिळणारे अनेक घटक हे पारंपारिक औषधांचे प्रमुख घटक म्हणून वापरले गेले आहेत. म्हणूनच मानवी आरोग्य सेवा प्रणालीमध्ये औषधी उपचारांसाठी प्राणी संसाधनांचे महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे. या आधुनिक युगात नॅनो-टेक्नॉलॉजी आणि जैविक साधनांची सांगड घालणे हे जैवविविधतेच्या निरंतर वापरातून शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे. हे नुकतेच संशोधन केलेल्या सदस्य, विद्या परिषद व अध्यक्ष प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ तसेच जैवविविधता अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले-पुणे, विद्यापीठ-पुणेचे प्राध्यापक डॉ. आर. डी. चौधरी तसेच त्यांच्या चमूतील सदस्य संशोधक डॉ. प्रमोद माने, डॉ.दिपाली माने, डॉ. आदित्य चौधरी आदी चमूने एक नवीन शोध लावून कॅन्सर या आजारासाठी औषधाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.