सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘राष्ट्रीय एकता दिन’

Edited by: मनोज पवार
Published on: November 01, 2025 17:17 PM
views 48  views

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान ‘श्रीमती इंदिरा गांधी’ यांची पुण्यतिथि निमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून आणि भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांची जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. 

यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते ‘सरदार वल्लभभाई पटेल’ आणि  ‘इंदिरा गांधी’ यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून आणि उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वानी 'राष्ट्रीय एकता दिन’ निमित्त एकतेची शपथ घेतली. डॉ. केतन चौधरी यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांचे देशाच्या एकीकरण मधील योगदान आणि त्यांचे कार्य याबाबत तर माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे कार्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याचवेळी ‘राष्ट्रीय सतर्कता सप्ताह’ (दि. २७ ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर) निमित्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्यनिष्ठता शपथ’ देण्यात आली.

यावेळी संशोधन केंद्रातील अधिकारी डॉ. एच.बी. धमगये (अभिरक्षक), प्रा. एन.डी. चोगले व प्रा. एस.बी. साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही.आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ), श्री. एस. तांबे (कार्यालय अधिक्षक) व श्री. आर.एम. सावर्डेकर (व.प्रयोगशाळा सहाय्यक) तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.