
मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद 12 पंचायत समिती जागांसाठी 80 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. यापैकी 5 अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
आचरा जिल्हा परिषद जागेसाठी दाखल 4 उमेदवारी अर्जांपैकी अनुष्का प्रशांत गावकर तसेच मसुरे जागेसाठी दाखल 6 उमेदवारी अर्जांपैकी सानिका सुशांत सुर्वे या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यासह आचरा पंचायत समिती जागेसाठी दाखल सहा उमेदवारी अर्जांपैकी शंकर मधुसूदन वस्त, मसुरे जागेसाठी दाखल 7 उमेदवारी अर्जांपैकी आत्माराम तुकाराम गावकर व कुंभारमाठ जागेसाठी दाखल 3 उमेदवारी अर्जांपैकी रश्मी राजेंद्र लुडबे अशा 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत अशी माहिती मालवण निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.










